मराठा समाजासाठी सारथी संस्था नक्की काय आणि कसं काम करते ? पहा संपूर्ण माहिती मराठीमध्ये

मराठा समाजासाठी सारथी संस्था नक्की काय आणि कसं काम करते ? पहा संपूर्ण माहिती मराठीमध्ये

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या व युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था पुणे अर्थात जातीची स्थापना करण्यात आली. विविध पद्धतीने सारथी मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत तसेच सर्व घटकांतील प्रगतीसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरूपामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आणि योजना सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत. या योजनां विषयी खूप लोकांना माहिती नाहीये आज आपण या योजना विषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

सारथी मध्ये आठ विभागीय केंद्रातून काम केले जातात

‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या ‘सारथी’ चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे त्याचे उपकेंद्र आहे. संस्थेचे काम अधिक गतीने आणि सुलभ रीत्या होण्यासाठी कोल्हापूर उपकेंद्र, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई मध्ये खारघर नवी मुंबई, कोल्हापूर, अशी एकूण आठ विभागीय कार्यालय सुरू करण्यात आली.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यासारखी संस्थेचा लाभ कसा मिळतो ?

सारथीच्या  माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध उपक्रम योजना या व्यापक स्वरूपात राबवण्यात येतात. राज्यातील जवळजवळ एक लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेचा विविध योजनांच्या लाभ घेतला आहे, जसे पीएचडी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107 प्रशिक्षण विभागाअंतर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत लाभ घेतला आहे, तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण विभाग अंतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तर सार्थीच्या इतर उपक्रमांतर्गत  60 हजार 140 जणांना लाभ झालेला आहे.

केंद्रीय लोकसभेच्या आयोगाच्या परीक्षांविषयी मार्गदर्शन

‘सारथी’ संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथे नामांकित प्रशिक्षण संस्थेत 500 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येत असतो प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ही सारथीमार्फत देण्यात येते.

राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व राज्यसेवा राजपत्रित नाईक सेवा अभियांत्रिक सेवा कृषी सेवा तसेच वन्य सेवा इत्यादी परीक्षांविषयी सारथीमार्फत  प्रशिक्षण देण्यात येते प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क सारथीमार्फत देण्यात येतं प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाते.

या प्रकारचे अनेक लाभ हे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी दिले जातात

अशाच विविध योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करा तसेच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला विजीट करून फॉलो करा.